बहीरेपणा : कारणे,उपाय व काळजी

सप्टेंबर महीन्याचा शेवटचा रविवार जागतिक बहीरेपणा दिवस म्हणून ओळखला जातो.या वर्षी हा दिवस २४ तारखेला आला आहे. आजच्या ‘कुणीही कुणाचे ऐकत नाही’ अशा या काळातही डॉक्टर व पेशंटस् यांचेसाठी मात्रं हा महत्वाचा व अपेक्षांचा दिवस आहे.

आपले मुल बहीरे जन्माला येणे जसे कुणाला आवडणार नाही तसेच आपण अथवा आपले नातेवाईक जन्मानंतर बहीरे झालेलेही कुणाला चालणार नाही.. शब्दं,स्पर्श, रुप,रस व गंधं यातली पहीली तन्मात्रा म्हणजे शब्दं..शब्दं म्हणजे बोलण्यातून व्यक्तं होणे,ऐकण्यातून शिकणे व गाण्यातून रिझवणे..यातूनच विज्ञान व कला व्रुद्धींगत होतात..अशी ही शैक्षणिक नैसर्गिक देणगी विविध कारणांमुळे नाकारली गेली तर माणसाच्या जीवनातील खूप मोठा आनंदं हिरावला जातो व यामुळेच बहीरेपणाच्या शापमुक्तिचा हा दिवस  उपाययोजनेच्या द्रुष्टीने डॉक्टर आणि रुग्ण  यांचेसाठी महत्वाचा व अपेक्षांचा ठरतो

बहीरेपणा दोन प्रकारचा असू शकतो.जन्मजात  किंवा जन्मानंतरच्या आजारांमुळे मिळालेला.

*बहीरेपणाची कारणे*

ही कारणे जन्मजात किंवा जन्मानंतर असू शकतात ज्याची मांडणी खालीलप्रमाणे करुयाः

१.जन्मजात बहीरेपणा : बाहेरील,मधल्या किंवा आतील कानातल्या आजारांमुळे येणारा बहीरेपणा.

२.जन्मानंतर बाह्यं कारणांनी येणारा बहीरेपणा खालीलपैकीः

अ.कानात मळ साचणे,कानाच्या नळीत सूज येणे,बुरशी होणे वा कानात किटक कींवा अन्यं वस्तु जसे पेन्सिल, रबर,कागद,मणी ई जाणे(हे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक)

ब.कानाच्या पडद्याला छिद्रं पडणे.

क.कानाची हाडे चिकटणे अथवा मोडणे

ड.कानामागील हाड पोखरणारा आजार

ई.आतील कानाचा विषाणु संसर्ग,वयोव्रुद्धि,औषधांचा दुष्परीणाम,फटाके, मोठे आवाज,ध्वनीप्रदूषण व अन्यं कारणांमुळे होणारा आजार.

*उपाययोजना*

१.जन्मंजात बहीरेपणा

आपले मुल बाह्यं कानाच्या अथवा आतील कानाच्या अपंगत्वामुळे बहीरे आहे हे पालकांच्या व विशेषतः मातेच्या त्वरित लक्षात येते.याची वेळीच दखल घेतली तर भविष्यातील  अडचणी टाळता येऊ शकतात.यासाठी विविध प्लास्टिक शस्त्रक्रिया तर आहेतच पण त्याचबरोबर आतील कानाचे प्रत्यारोपण (cochlear implant)ही शस्त्रक्रिया आज सर्वमान्यं व लोकप्रिय झाली आहे हे नमूद करावेसे वाटते.

२.बाह्यकारणांनी येणारा बहीरेपणा :

अ.कानात मळ साचला तर तो waxolve ear drops ने सैल करुन कानात पिचकारी मारुन साफ करता येतो.(व यामुळे डॉक्टर व रुग्ण यांना रंगपंचमीचा आनंदही मिळतो).

बुरशी हवेच्या मशीनने काढून औषधोपचार करता येतो. नळीत सूज असेल तर औषधोपचार काम करतात. डायबेटीसच्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते.कानात किटक कींवा ईतर गोष्टी गेल्या असतील तर वेळप्रसंगी रुग्णाला बेशुध्द करून कान साफ करावा लागतो.फटाक्यांपासुन दुर राहाणे गरजेचे आहे.

कानाच्या पडद्याच्या छिद्राचे व हाडांचे ऑपरेशनच करणे गरजेचे असते.कानामागील हाड सडून मेंदुपर्यंत आजार जाण्याची शक्यता असेल तर ऑपरेशन अत्यावश्यक ठरते.

३ कानाची ऐकण्याची नस कमजोर झाली असेल तर श्रवणयंत्रं किंवा ईतर उपकरणे आजकाल उपलब्धं आहेत.

*बहीरेपणा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी:

१.जन्मजात बहीरेपणा लक्षात आल्यावर त्वरित दखल घ्यावी. या आजारांसाठी श्रवणयंत्रे किंवा आतील कानाचे प्रत्यारोपण उपलब्धं आहे.

२.कानाच्या पडद्याच्या छिद्राचे,हाडसाखळीचे व कानामागील हाडाचे ऑपरेशन करुन घ्यावे व प्रत्यारोपण करावे.

३.कानात काडी,पेन्सिल वा ईतर कुठलिही वस्तु घालू नये.

४.बहीरेपणाच्या कारणांचा तात्काळ ईलाज करणे.

जागतिक बहीरेपणा दिवस आपल्याला दिवसेंदिवस अधीक ‘कानाळू’ करो ही सदीच्छा!

By

Dr Dinesh Vaidya

Professor and Head of Department of ENT

K.J. Somaiya Medical College

 

Leave a Reply

Up ↑

%d